Latest Job
Results
Syllabus
Exam Date
Notifications
महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या नोकरींची माहिती
महाराष्ट्रातील तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये दरवर्षी अनेक सरकारी नोकरीच्या संधी आणि स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्रात राहणारे उमेदवार त्यांच्या शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि संबंधित पात्रतेनुसार महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र शासनाच्या भरतीमध्ये MPSC, महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग, पोलीस, महसूल, आरोग्य, शिक्षण, नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच इतर विभागांतील पदांचा समावेश होतो.
केंद्र सरकारच्या भरतीमध्ये UPSC, SSC, Railway, Banking, Defence, India Post तसेच केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांमधील पदांचा समावेश होतो.
सरकारी सेवांमध्ये गट-अ, गट-ब, गट-क आणि इतर विविध पदे उपलब्ध असतात. गट-अ आणि गट-ब पदांसाठी प्रामुख्याने UPSC, MPSC आणि इतर संबंधित स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. गट-क आणि इतर पदांसाठी संबंधित विभाग किंवा भरती संस्था परीक्षा व निवड प्रक्रिया राबवतात.
महा जॉब अड्डा वर महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी सरकारी भरतीच्या जाहिराती, पात्रता, वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत आणि नवीन अपडेट्स उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे